Psalms 150

1परमेश्वराची स्तुती करा.
देवाची त्याच्या पवित्रस्थानात स्तुती करा.
त्याच्या सामर्थ्याच्या स्वर्गात स्तुती करा.
2त्याच्या सामर्थ्यशाली कृत्यांसाठी त्याची स्तुती करा;
त्याच्या महान उत्कृष्टतेसाठी त्याची स्तुती करा.

3शिंग वाजवून त्याची स्तुती करा;

सतार आणि वीणा यांनी त्याची स्तुती करा.
4डफांनी आणि नाचून त्याची स्तुती करा;
तंतुवाद्याने आणि वायुवाद्याने त्याची स्तुती करा.
5जोराने झांज वाजवून त्याची स्तुती करा;
उंच आवाजाने झांज वाजवून त्याचे स्तुती करा.

6प्रत्येक श्वास घेणारा परमेश्वराची स्तुती करो.

परमेश्वराची स्तुती करा.
Copyright information for MarULB